अ.क्र. | योजना | सविस्तर माहिती |
---|---|---|
१७.९ | योजनेचे नांव | शैक्षणिक कर्ज योजना |
२ | योजनेचा प्रकार | केंद्र शासनाच्या योजना राष्ट्रीय अनुसूचित जाती वित्त व विकास महामंडळ (एन.एस.एफ.डी.सी.), नवी दिल्ली यांच्या योजना |
३ | योजनेचा उद्देश | अनूसुचित जातीतील चर्मकार समाजातील (चर्मकार, ढोर, होलार, मोची इत्यादी) व्यक्तींना त्यांचे जीवनमान उंचविणे, समाजप्रवाहात त्यांना मानाचे स्थान मिळण्याच्या उद्देशाने त्यांचा शैक्षणिक, आर्थिक व सामाजिक विकास होण्यासाठी महामंडळामार्फत योजना राबविण्यात येतात. |
४ | योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नांव | अनुसूचित जातीतील चर्मकार समाज. |
५ | योजनेच्या प्रमुख अटी |
( अ) अर्जदाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ग्रामीण भागासाठी रु.९८०००/ व शहरी भागासाठी रु.१२००००/ पर्यंत असावे.
महामंडळाने वेळोवेळी घालून दिलेल्या अटी व शर्ती अर्जदारावर बंधनकारक राहतील. |
६ | दिल्या जाणाया लाभाचे स्वरुप | एनएसएफडीसी नवी दिल्ली यांच्या कर्ज योजने अंतर्गत सन २००९ या वर्षापासून शैक्षणिक कर्ज योजना राबविण्यात येत आहे. सदर योजने अंतर्गत शैक्षणिक कर्ज योजना राबविण्यात येत आहे. सदर योजने अंतर्गत शैक्षणिक कर्ज मर्यादर देशात शिक्षणसाठी रु.१० लाख व परदेशासाठी रु.२० लाख इतकी आहे. या कर्जावर ४ टक्के व्याजदर आकारण्यात येतो. |
७ | अर्ज करण्याची पध्दत |
अर्जदाराने विहित नमुन्यातील अर्ज भरुन संपूर्ण कागदपत्रांसह जिल्हा कार्यालयात अर्ज सादर करावयाचा आहे. |
८ | योजनेची वर्गवारी | शैक्षणिक |
९ | संपर्क कार्यालयाचे नांव | सोबत जिल्हा कार्यालयांची यादी जोडली आहे. |
अ.क्र. | योजना | सविस्तर माहिती |
---|---|---|
१७.३ | योजनेचे नांव | प्रशिक्षण योजना |
२ | योजनेचा प्रकार | राज्य शासनाच्या योजना |
३ | योजनेचा उद्देश | अनूसुचित जातीतील चर्मकार समाजातील (चर्मकार, ढोर, होलार, मोची इत्यादी) व्यक्तींना त्यांचे जीवनमान उंचविणे, समाजप्रवाहात त्यांना मानाचे स्थान मिळण्याच्या उद्देशाने त्यांचा शैक्षणिक, आर्थिक व सामाजिक विकास होण्यासाठी महामंडळामार्फत योजना राबविण्यात येतात. |
४ | योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नांव | अनुसूचित जातीतील चर्मकार समाज. |
५ | योजनेच्या प्रमुख अटी |
( अ) अर्जदाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ग्रामीण भागासाठी रु.९८०००/ व शहरी भागासाठी रु.१२००००/ पर्यंत असावे.
महामंडळाने वेळोवेळी घालून दिलेल्या अटी व शर्ती अर्जदारावर बंधनकारक राहतील. |
६ | दिल्या जाणाया लाभाचे स्वरुप | प्रशिक्षणार्थी व्यक्तीस रु.३००/ ते ४००/ विद्यावेतन देण्यात येते. सदर योजनेच्या अंतर्गत शिवणकला, सौंदर्य शास्त्र, संगणक, प्रशिक्षण चर्मोद्योग ई. व्यवसाय प्रशिक्षण संस्थेमार्फत दिले जाते. |
७ | अर्ज करण्याची पध्दत |
अर्जदाराने विहित नमुन्यातील अर्ज भरुन संपूर्ण कागदपत्रांसह जिल्हा कार्यालयात अर्ज सादर करावयाचा आहे. |
८ | योजनेची वर्गवारी | शैक्षणिक |
९ | संपर्क कार्यालयाचे नांव | सोबत जिल्हा कार्यालयांची यादी जोडली आहे. |
अ.क्र. | वर्ष | खर्च | प्रशिक्षणार्थी |
१ | २०१२१३ | १७.५४ | ४१० |
२ | २०१३१४ | १७.०५ | २०७ |
३ | २०१४१५ | १०.१३ | ७२६ |
अ.क्र. | योजना | सविस्तर माहिती |
---|---|---|
१७.९ | योजनेचे नांव | शैक्षणिक कर्ज योजना |
२ | योजनेचा प्रकार | केंद्र शासनाच्या योजना राष्ट्रीय अनुसूचित जाती वित्त व विकास महामंडळ (एन.एस.एफ.डी.सी.), नवी दिल्ली यांच्या योजना |
३ | योजनेचा उद्देश | अनूसुचित जातीतील चर्मकार समाजातील (चर्मकार, ढोर, होलार, मोची इत्यादी) व्यक्तींना त्यांचे जीवनमान उंचविणे, समाजप्रवाहात त्यांना मानाचे स्थान मिळण्याच्या उद्देशाने त्यांचा शैक्षणिक, आर्थिक व सामाजिक विकास होण्यासाठी महामंडळामार्फत योजना राबविण्यात येतात. |
४ | योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नांव | अनुसूचित जातीतील चर्मकार समाज. |
५ | योजनेच्या प्रमुख अटी |
( अ) अर्जदाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ग्रामीण भागासाठी रु.९८०००/ व शहरी भागासाठी रु.१२००००/ पर्यंत असावे.
महामंडळाने वेळोवेळी घालून दिलेल्या अटी व शर्ती अर्जदारावर बंधनकारक राहतील. |
६ | दिल्या जाणाया लाभाचे स्वरुप | एनएसएफडीसी नवी दिल्ली यांच्या कर्ज योजने अंतर्गत सन २००९ या वर्षापासून शैक्षणिक कर्ज योजना राबविण्यात येत आहे. सदर योजने अंतर्गत शैक्षणिक कर्ज योजना राबविण्यात येत आहे. सदर योजने अंतर्गत शैक्षणिक कर्ज मर्यादर देशात शिक्षणसाठी रु.१० लाख व परदेशासाठी रु.२० लाख इतकी आहे. या कर्जावर ४ टक्के व्याजदर आकारण्यात येतो. |
७ | अर्ज करण्याची पध्दत |
अर्जदाराने विहित नमुन्यातील अर्ज भरुन संपूर्ण कागदपत्रांसह जिल्हा कार्यालयात अर्ज सादर करावयाचा आहे. |
८ | योजनेची वर्गवारी | शैक्षणिक |
९ | संपर्क कार्यालयाचे नांव | सोबत जिल्हा कार्यालयांची यादी जोडली आहे. |
अ.क्र. | योजना | सविस्तर माहिती |
---|---|---|
1. | योजनेचे नाव | मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी शिक्षण शुल्क आणि परीक्षा शुल्क. |
2. | योजनेचा प्रकार | राज्य |
3. | योजनेचा उदेृश | मागासवर्गीय विद्यार्थ्यांना महाविद्यालयिन/उच्च शिक्षण घेता यावे, विद्यार्थ्याचे गळतिचे प्रमाण कमी व्हावे. |
4. | योजना ज्या प्रवगासाठी लागू आहे त्याचे नाव | अनुसूचित जाती |
5. | योजनेच्या प्रमुख अटी |
|
6. | दिल्या जाणा-या लाभाचे स्वरुप | शालांत परीक्षोत्तर शिक्षण घेणा-या अनु. जातीच्या विद्यार्थाना त्यांचे उत्पन्न विचारात न घेता सर्व मॅट्रिकोत्तर शैक्षणिक अभ्यास क्रमासाठी शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क व इतर विहीत केलेले शुल्क देण्यात येते. |
7. | अर्ज करण्याची पध्दत | या योजनेसाठी http//mahaeschool.maharashtra.gov.in या वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज भरणे आवश्यक |
8. | योजनेची वर्गवारी | शिक्षण |
9. | संपर्क कार्यालयाचे नाव | संबधित जिल्हयाचे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण आणि महाविद्यालयाचे प्राचार्य |
अ.क्र. | योजना | सविस्तर माहिती |
---|---|---|
1. | योजनेचे नांव | सैनिक शाळेतील अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता |
2 | योजनेचा प्रकार | राज्य |
3 | योजनेचा उद्देश | मागासवर्गीय विद्यार्थ्यांना राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीमध्ये प्रवेश मिळावा, सैन्यदलात भरती होण्याचे विद्यार्थी दशेतच त्यांच्यात निर्माण व्हावे, विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, आत्मविश्वास, शौर्य, सांघिक वृत्ती, नेतृत्व, देशभक्ती इत्यादी गुणांची जोपासना होण्यासाठी ही योजना सुरु करण्यात आली आहे. |
4 | योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नांव | अनुसूचित जाती |
5 | योजनेच्या प्रमुख अटी |
|
6 | दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरुप |
|
7 | अर्ज करण्याची पध्दत | या योजनेसाठी http//mahaeschool.maharashtra.gov.in या वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज भरणे आवश्यक |
8 | योजनेची वर्गवारी | शैक्षणिक |
9 | संपर्क कार्यालयाचे नांव |
|
अ. क्र. | योजना | सविस्तर माहिती | ||||||||||||
---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
1. | योजनेचे नाव | विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गासाठी वाहन चालक प्रशिक्षण योजना | ||||||||||||
2 | योजनेचा प्रकार | राज्यस्तरीय योजना | ||||||||||||
3 | योजनेचा उद्देश. | मोटार वाहन चालक प्रशिक्षण ही योजना शासन निर्णय क्र. इबीसी-1970/121397-जे, दि.7.9.1972 अन्वये विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गाच्या उमेदवारांना लागू करण्यात आली. सदर योजनेत सुधारणा करुन शासन निर्णय क्र. संकीर्ण/1095/ प्र.क्र.57/ मावक-2, दि.26/7/1995 व दि.23.7.2009 आणि शासन शुध्दीपत्रक दि.30 जुलै, 2009 नुसार युवक व युवतींना वाहन चालक व वाहक प्रशिक्षण देण्याची येाजना मोटार ड्रायव्हिंग प्रशिक्षण देणाऱ्या संस्थेमार्फत राज्यातील सर्व जिल्हयात राबविण्यात येते. त्याकरिता प्रशिक्षण देणाऱ्या संस्थेस शासन निर्णय दि.27.2.2013 नुसार खालीलप्रमाणे रक्कम अदा केली जाते.
तसेच शासन शुध्दीपत्रक दि.15 मार्च, 2012 नुसार लाभार्थ्यांना पोस्टाने चालक/ वाहक परवाना पाठविणेकरीता प्रतिलाभार्थी रु.100/- एवढी रक्कम मंजुर करण्यात येते. |
||||||||||||
4 | योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नाव |
विमुक्त जाती/ भटक्या जमाती/ इतर मागासवर्ग / विशेष मागास प्रवर्ग. | ||||||||||||
5 | योजनेच्या प्रमुख अटी |
|
||||||||||||
6 | दिल्या जाणा-या लाभाचे स्वरुप | प्रशिक्षण केंद्राच्या मुख्यालयी राहणारा स्थानिक प्रशिक्षणार्थी वसतिगृहात रहात नसल्यास मोटार वाहन चालक प्रशिक्षणार्थीस रु.300/- व वाहक प्रशिक्षणार्थ्यास रु.150/- याप्रमाणे प्रशिक्षण काळात विद्यावेतन देणे प्रशिक्षण संस्थेवर बंधनकारक राहील. | ||||||||||||
7 | अर्ज करण्याची पध्दत | संबंधित जिल्हयाचे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयाकडे अर्ज करावा. | ||||||||||||
8 | योजनेची वर्गवारी | आर्थिक | ||||||||||||
9 | संपर्क कार्यालयाचे नांव | संबंधित जिल्हयाचे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण. |
अ. क्र. | योजना | सविस्तर माहिती |
---|---|---|
1. | योजनेचे नाव | इयत्ता 5 वी ते 7 वी मध्ये शिकणा-या विजाभज / विमाप्र प्रवर्गाच्या विद्यार्थींनींना सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना. |
2 | योजनेचा प्रकार | राज्यस्तरीय योजना |
3 | योजनेचा उद्देश. | शासन निर्णय दिनांक 12 जानेवारी, 1996 अन्वये विजाभज विद्यार्थीनीं करिता व शासन निर्णय दिनांक 29 ऑक्टोबर, 1996 पासून विमाप्र प्रवर्गाच्या विद्यार्थींनींना सुध्दा लागू करण्यांत आली आहे. सदरहू प्रवर्गाच्या विद्यार्थींनींचे गळतीचे प्रमाण कमी करण्यांसाठी प्रोत्साहनपर अनुदान म्हणून ही शिष्यवृत्ती दिली जाते. |
4 | योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नाव |
विमुक्त जाती व भटक्या जमाती/ विशेष मागास प्रवर्ग. |
5 | योजनेच्या प्रमुख अटी |
|
6 | दिल्या जाणा-या लाभाचे स्वरुप | प्रति विद्यार्थीनीस दरमाह रुपये 60/- याप्रमाणे 10 महिन्या करीता रु.600/- शिष्यवृत्तीची रक्कम संबंधीत लाभार्थ्यांस अदा केली जाते. |
7 | अर्ज करण्याची पध्दत | सदर योजनेचे संगणकीकरण झालेले असून ऑनलाईन फॉर्म भरण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांनी https://mahaeschol.maharashtra.gov.in या वेबसाईटवर या योजनेंतर्गत पात्र विद्यार्थिनींचे अर्ज / माहिती भरुन संबंधित जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद यांचेकडे सादर करावी. |
8 | योजनेची वर्गवारी | शैक्षणिक |
9 | संपर्क कार्यालयाचे नांव |
|
अ. क्र. | योजना | सविस्तर माहिती |
---|---|---|
1. | योजनेचे नाव | माध्यमिक शाळेत शिकत असलेल्या विजाभज / विमाप्र प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना गुणवत्ता शिष्यवृत्ती प्रदान करणे. |
2 | योजनेचा प्रकार | राज्यस्तरीय योजना |
3 | योजनेचा उद्देश. | शासन निर्णय दिनांक 29 ऑगस्ट, 1966 अन्वये ही योजना विजाभज विद्यार्थ्यांना लागू करण्यांत आली. शासन निर्णय क्र. इबीसी-1094/प्र.क्र. 109/मावक-2, दि.17-8-1995 अन्वये ही योजना सुधारीत केली आहे. त्याचप्रमाणे शासन निर्णय दिनांक 29 ऑक्टोबर, 1996 अन्वये ही योजना विमाप्र प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना सुध्दा लागू करण्यांत आली आहे. माध्यमिक शाळेतील हुशार व गुणवान विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याकरिता ही योजना सुरु करण्यांत आली आहे. |
4 | योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नाव |
विमुक्त जाती व भटक्या जमाती/ विशेष मागास प्रवर्ग. |
5 | योजनेच्या प्रमुख अटी |
|
6 | दिल्या जाणा-या लाभाचे स्वरुप | इ. 5 वी ते 7 वी मध्ये शिकणा-या विद्यार्थ्यांना दरमाह रु. 20/- प्रमाणे 10 महिन्यासाठी रु. 200/- व इ. 8वी ते 10 वी मध्ये शिकणा-या विद्यार्थ्यांना दरमाह रु.40/- याप्रमाणे 10 महिन्याकरीता रुपये 400/- शिष्यवृत्ती दिली जाते. |
7 | अर्ज करण्याची पध्दत |
|
8 | योजनेची वर्गवारी | शैक्षणिक |
9 | संपर्क कार्यालयाचे नांव |
|
अ. क्र. | योजना | सविस्तर माहिती |
---|---|---|
1. | योजनेचे नाव | माध्यमिक शाळेत शिक्षण घेणाऱ्या विजाभज / विमाप्र विद्यार्थ्यांना शिक्षण फी परीक्षा फी व अन्य फी प्रदान करणे. |
2 | योजनेचा प्रकार | राज्यस्तरीय योजना |
3 | योजनेचा उद्देश. | शासन निर्णय क्र. इबीसी/1068/83567/जे, दिनांक 24 डिसेंबर, 1970 अन्वये ही योजना विजाभज प्रवर्गाकरीता लागू करण्यांत आली असून शासन निर्णय क्र. इबीसी/1094/प्र.क्र.91/मावक-2, दिनांक 29 ऑक्टोंबर, 1996 अन्वये विमाप्र प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना सुध्दा योजना लागू करण्यांत आली आहे. सदरहू प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांचे वय व उत्पन्न विचारात न घेता माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्क ,परिक्षा शुल्क, वाचनालय फी, प्रयोगशाळा व क्रिडांगण फी प्रदान करण्यात येते. |
4 | योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नाव |
विमुक्त जाती व भटक्या जमाती/ विशेष मागास प्रवर्ग. |
5 | योजनेच्या प्रमुख अटी |
|
6 | दिल्या जाणा-या लाभाचे स्वरुप |
|
7 | अर्ज करण्याची पध्दत |
|
8 | योजनेची वर्गवारी | शैक्षणिक |
9 | संपर्क कार्यालयाचे नांव |
|
अ. क्र. | योजना | सविस्तर माहिती |
---|---|---|
1. | योजनेचे नाव | औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकणा-या विजाभज व विमाप्र विद्यार्थ्यांना विद्यावेतन. |
2 | योजनेचा प्रकार | राज्यस्तरीय योजना |
3 | योजनेचा उद्देश. | सदरची योजना शासन निर्णय क्र.ईबीसी-1079/56243/डी-1, दि.07.05.1983 अन्वये लागू करण्यात आलेली आहे. सदर योजने अंतर्गत विजाभज व विमाप्र प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांचा तांत्रिक शिक्षणाकडे कल वाढण्यासाठी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये प्रशिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांना विद्यावेतन दिले जाते. तांत्रिक शिक्षण विभागांकडून प्रतिमहा रु.40/- व या विभागामार्फत प्रतिमहा रु.60/- याप्रमाणे विद्यावेतन दिले जाते. ज्या विजाभज व विमाप्र विद्यार्थ्यांना तांत्रिक शिक्षण मंडळांकडून विद्यावेतन दिले जात नाही. त्या पात्र विद्यार्थ्यांना प्रतिमहा रु.100/- याप्रमाणे या विभागांकडून विद्यावेतन दिले जाते. |
4 | योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नाव |
विमुक्त जाती भटक्या जमाती/ विशेष मागास प्रवर्ग. |
5 | योजनेच्या प्रमुख अटी |
|
6 | दिल्या जाणा-या लाभाचे स्वरुप | प्रति विद्यार्थी प्रतिमाह रु.100/- या प्रमाणे विद्यावेतन दिले जाते. |
7 | अर्ज करण्याची पध्दत | संबंधित औद्योगिक प्रशिक्षण संस्थेने पात्र विद्यार्थ्यांचे प्रस्ताव सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण यांच्या कार्यालयाकडे सादर करावेत. |
8 | योजनेची वर्गवारी | शैक्षणिक |
9 | संपर्क कार्यालयाचे नांव |
|
अ. क्र. | योजना | सविस्तर माहिती |
---|---|---|
1. | योजनेचे नाव | शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधून विजाभज व विमाप्र प्रवर्गातील उमेदवारांना व्यावसायिक प्रशिक्षण देण्याची योजना (मागेल त्याला प्रशिक्षण). |
2 | योजनेचा प्रकार | राज्यस्तरीय योजना |
3 | योजनेचा उद्देश. |
विजाभज व विमाप्र प्रवर्गातील बेरोजगार/अल्पशिक्षीत उमेदवारांना शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये उपलब्ध असलेल्या प्रशिक्षण सुविधांचा व साधन सामुग्रीचा यथायोग्य वापर करुन अल्प कालावधीचे प्रशिक्षण देऊन या प्रशिक्षीत उमेदवारांना स्वयंरोजगार मिळावा, या हेतूने शासन निर्णय क्र. इमाव 2003/प्रक्र-208/ मावक-3, दि.25.7.2003 अन्वये सन 2003-04 पासून सदरहू योजना लागू केलेली आहे.प्रशिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवारांना स्वत:चा उद्योग सुरु करण्यासाठी टुल्सचा एक संच किंमत रु.1000/- च्या मर्यादेत देण्यात येतो. ही योजना संचालक, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण विभाग, मुंबई यांचे मार्फत राबविण्यात येते. |
4 | योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नाव |
विमुक्त जाती व भटक्या जमाती/ विशेष मागास प्रवर्ग. |
5 | योजनेच्या प्रमुख अटी |
|
6 | दिल्या जाणा-या लाभाचे स्वरुप |
प्रशिक्षण खर्चासाठी प्रती विद्यार्थी प्रति अभ्यासक्रमास, प्रशिक्षणाच्या |
7 | अर्ज करण्याची पध्दत | संबंधित शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्यांनी पात्र विद्यार्थ्यांचे प्रस्ताव तयार करुन संचालक, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, मुंबई या कार्यालयास सादर करावेत. |
8 | योजनेची वर्गवारी | शैक्षणिक |
9 | संपर्क कार्यालयाचे नांव |
|
अ. क्र. | योजना | सविस्तर माहिती |
---|---|---|
1. | योजनेचे नाव | सैनिकी शाळेत शिक्षण घेणा-या विजाभज / विमाप्र प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता. |
2 | योजनेचा प्रकार | राज्यस्तरीय योजना |
3 | योजनेचा उद्देश. |
सैनिकी शाळेत शिक्षण घेणां-या विजाभज प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना शासन निर्णय क्र.इबीसी-1074/564/का-5, दि. 6 ऑगस्ट 1976 अन्वये सदरील योजना लागू करण्यांत आली आहे. त्याच धर्तीवर शासन निर्णय क्र.संकिर्ण-2002/प्र.क्र.371/मावक-3, दि.5 ऑगस्ट, 2003 अन्वये सदरील योजना विमाप्र प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्ष 2003-2004 पासून लागू केलेली आहे. शासन निर्णय क्र. इबीसी-2003/प्र.क्र.184/मावक-2, दि.17/9/2003 अन्वये रु.15000/- वार्षिक शुल्क निश्चित करण्यात आले आहे. सैनिकी शाळेत शिक्षण घेणां-या विजाभज व विमाप्र प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांनी शिक्षण घेवून भारतीय सैन्य दलामध्ये प्रवेश घेण्यांसाठी प्रोत्साहन मिळणेसाठी ही योजना सुरु करण्यांत आली आहे. |
4 | योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नाव | विमुक्त जाती व भटक्या जमाती/ विशेष मागास प्रवर्ग. |
5 | योजनेच्या प्रमुख अटी | 1. विद्यार्थी हा शासन मान्यता प्राप्त सैनिकी शाळेत शिकत असावा. 2. विद्यार्थ्यांच्या पालकाचे वार्षिक उत्पन्न रुपये 1.00 लाखा पर्यंत असावे. 3.विद्यार्थी विजाभज / विमाप्र प्रवर्गाचा असावा. |
6 | दिल्या जाणा-या लाभाचे स्वरुप | सातारा सैनिक शाळा, भोसला मिलीटरी स्कुल, नाशिक व एसएसपीएमएस सैनिक शाळा, पुणे या 3 शाळातील विजाभज व विमाप्र विद्यार्थ्यांना भोजन, कपडे, निवास शिक्षण फी व परिक्षा फी, क्रीडा, घोडेस्वार व पॉकेट मनीसाठी संपूर्ण खर्च शासन देते. या व्यतिरिक्तच्या राज्य शासन मान्यता प्राप्त सैनिकी शाळेतील प्रवेशितास प्रति विद्यार्थी वार्षिक रुपये 15000/- पर्यंत निर्वाह भत्याची रक्कम संबधीत सैनिकी शाळेस अदा केली जाते. |
7 | अर्ज करण्याची पध्दत | सदर योजनेचे संगणकीकरण झालेले असून ऑनलाईन फॉर्म भरण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. संबंधित सैनिकी शाळेच्या मुख्याध्यापकांनी https://mahaeschol.maharashtra.gov.in या वेबसाईटवर सैनिकी शाळेत शिक्षण घेणा-या विजाभज / विमाप्र प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता या योजनेंतर्गत विद्यार्थ्यांचे अर्ज / माहिती भरुन कागदपत्रांची छाननी करुन पात्र लाभार्थ्यांचे अर्ज संबंधित सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण यांचेकडे मंजूरीसाठी सादर करावेत. |
8 | योजनेची वर्गवारी | शैक्षणिक |
9 | संपर्क कार्यालयाचे नांव |
|
अ. क्र. | योजना | सविस्तर माहिती | ||||||||||||
---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
1 | योजनेचे नाव | व्यावसायिक पाठयक्रमाशी संलग्न असलेल्या वसतिगृहांतील विद्यार्थ्यांना विद्यावेतन तसेच व्यावसायिक पाठयक्रमाशी संलग्न असणाऱ्या वसतिगृहाच्या व शासकीय वसतिगृहाच्या बाहेर राहणाऱ्या परंतु वसतिगृहात प्रवेश मिळण्यासाठी पात्र असणाऱ्या विद्यार्थ्यांना विद्यावेतन. | ||||||||||||
2 | योजनेचा प्रकार | राज्यस्तरीय योजना | ||||||||||||
3 | योजनेचा उद्देश. | व्यावसायिक पाठयक्रमाशी संलग्न असणाऱ्या व वसतिगृहात राहणाऱ्या विजाभज व विमाप्र प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्तीव्दारे मिळणाऱ्या निर्वाह भत्यामधून व्यावसायिक अभ्यासक्रमाची पुस्तके, भोजन, निवास, स्टेशनरी इत्यादी बाबींचा खर्च भागत नाही, म्हणून राज्य सरकारच्या मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती व्यतिरिक्त विद्यावेतन देण्याचा शासनाने शासन निर्णय क्र.इमाव-2003/ प्रक्र-202/मावक-3, दि.18/7/2003 अन्वये निर्णय घेतलेला आहे. | ||||||||||||
4 | योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नाव | विमुक्त जाती व भटक्या जमाती/ विशेष मागास प्रवर्ग. | ||||||||||||
5 | योजनेच्या प्रमुख अटी | (अ) (1) विद्यार्थी व्यावसायिक पाठयक्रमासाठी प्रवेशित असावा. (2) राज्य सरकारची मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती धारक असावा. (3) पालकाचे वार्षिक उत्पन्न रु. एक लाख पेक्षा कमी असावे. (4) विद्यार्थ्याने शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी अर्ज केलेला असावा. (5) व्यावसायिक पाठयक्रम महाविद्यालयाशी संलग्न असलेल्या वसतिगृहामध्ये प्रवेशित असावा, किंवा त्या वसतिगृहात प्रवेशास जागा उपलब्ध नाही असे प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक. (6) स्थानिक किंवा स्वत:च्या घरी राहणारा विद्यार्थी सदर शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरणार नाही. (ब) जे विद्यार्थी वसतिगृहा बाहेर राहत आहेत अशा विद्यार्थ्यांना व्यावसायिक पाठयक्रमाशी संलग्न असणाऱ्या वसतिगृहात तसेच तेथील शासकीय वसतिगृहात अर्ज करुन व पात्र असूनही प्रवेश मिळाला नसल्याचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक. | ||||||||||||
दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरुप |
|
|||||||||||||
7 | अर्ज करण्याची पध्दत | सदर योजनेचे संगणकीकरण झालेले असून ऑनलाईन फॉर्म भरण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. लाभार्थ्यांनी https://mahaeschol.maharashtra.gov.in या वेबसाईटवर जाऊन या योजनेंतर्गत अर्ज भरुन महाविद्यालयास सादर करावा. संबंधित महाविद्यालयाने सर्व कागदपत्रांची छाननी करुन पात्र लाभार्थ्यांचे अर्ज संबंधित सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण यांचेकडे मंजूरीसाठी सादर करावेत. | ||||||||||||
8 | योजनेची वर्गवारी | शैक्षणिक | ||||||||||||
9 | संपर्क कार्यालयाचे नांव |
|
अ. क्र. | योजना | सविस्तर माहिती |
---|---|---|
1 | योजनेचे नाव | इ.8वी ते 10 वी मध्ये शिक्षण घेणाऱ्या विजाभज व विमाप्र प्रवर्गाच्या मुलींना सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना . |
2 | योजनेचा प्रकार | राज्यस्तरीय योजना. |
3 | योजनेचा उद्देश. | माध्यमिक शाळेत शिक्षण घेणाऱ्या विजाभज व विमाप्र प्रवर्गाच्या मुलींचे गळतीचे प्रमाण कमी व्हावे, यासाठी राज्य शासनाने शासन निर्णय क्र.इमाव-2003/प्र.क्र.201/मावक-3, दि.25.7.2003 अन्वये सन 2003-04 या शैक्षणिक वर्षापासून ही योजना लागू केलेली आहे. |
4 | योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नाव |
विमुक्त जाती व भटक्या जमाती/ विशेष मागास प्रवर्ग. |
5 | योजनेच्या प्रमुख अटी |
|
6 | दिल्या जाणा-या लाभाचे स्वरुप | इ.8 वी ते 10 वी मध्ये शिकणा-या सदर प्रवर्गातील विद्यार्थीनींना दरमहा रु.100 /- या प्रमाणे 10 महिन्यांसाठी रु. 1000/- एवढी शिष्यवृत्ती संबंधित शाळेमार्फत त्यांचे उत्पन्न व गुणांची अट लक्षात न घेता देण्यात येते. |
7 | अर्ज करण्याची पध्दत | सदर योजनेचे संगणकीकरण झालेले असून ऑनलाईन फॉर्म भरण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांनी https://mahaeschol.maharashtra.gov.in या वेबसाईटवर जावून इ.8वी ते 10 वी मध्ये शिक्षण घेणाऱ्या विजाभज व विमाप्र प्रवर्गाच्या मुलींना सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना या योजनेच्या पात्र विद्यार्थिनींचे अर्ज भरुन संबंधित सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण यांचेकडे सादर करावेत. |
8 | योजनेची वर्गवारी | शैक्षणिक |
9 | संपर्क कार्यालयाचे नांव |
|
अ. क्र. | योजना | सविस्तर माहिती |
---|---|---|
1 | योजनेचे नाव | इयत्ता 10 वी च्या परीक्षेत विशेष प्राविण्य मिळवून इयत्ता 11 वी मध्ये प्रवेश घेतलेल्या तसेच इ.12 वी मध्ये शिक्षण घेणा-या विजाभज / विमाप्र प्रवर्गाच्या मुला-मुलींना राजर्षी छत्रपतीशाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती. |
2 | योजनेचा प्रकार | राज्यस्तरीय योजना |
3 | योजनेचा उद्देश. | विजाभज / विमाप्र प्रवर्गाच्या मुला- मुलींचा शैक्षणिक दर्जा सुधारावा, त्यांच्या गुणवत्तेमध्ये वाढ व्हावी, या उद्देशाने शासन निर्णय क्र. इमाव 2003/प्र.क्र.204/मावक-3, दिनांक 25 जुलै 2003 अन्वये सदरची योजना शैक्षणिक वर्ष 2003-04 पासून सुरु करण्यांत आली. |
4 | योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नाव | विमुक्त जाती/ भटक्या जमाती/ विशेष मागास प्रवर्ग. |
5 | योजनेच्या प्रमुख अटी | 1. विद्यार्थी हा विजाभज / विमाप्र प्रवर्गाचा असावा. 2. विद्यार्थी इयत्ता 11 वी व 12 वी कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षण घेणारा असावा. 3. सदरील शिष्यवृत्ती करिता उत्पन्नाची अट नाही. 4.विद्यार्थ्यास इयत्ता 10 वी मध्ये 75 टक्के व त्या पेक्षा जास्त गुण मिळणे आवश्यक आहे. 5. ही शिष्यवृत्ती भारत सरकार शिष्यवृत्ती व इतर गुणवत्ता शिष्यवृत्ती योजने व्यतिरिक्त असेल. |
6 | दिल्या जाणा-या लाभाचे स्वरुप | प्रति विद्यार्थी प्रतिमहा रुपये 300/- या प्रमाणे 10 महिन्यांकरीता एकूण रु. 3000/- चा लाभ इयत्ता 11 वी व 12 वी मध्ये विद्यार्थ्यांस शिष्यवृत्ती म्हणून देण्यांत येतेा. |
7 | अर्ज करण्याची पध्दत | सदर योजनेचे संगणकीकरण झालेले असून ऑनलाईन फॉर्म भरण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. लाभार्थी विद्यार्थ्यांनी https://mahaeschol.maharashtra.gov.in यावेबसाईटवर लाभार्थ्यांनी इयत्ता 10 वी च्या परीक्षेत विशेष प्राविण्य मिळवून इयत्ता 11 वी मध्ये प्रवेश घेतलेल्या तसेच इ.12 वी मध्ये शिक्षण घेणा-या विजाभज / विमाप्र प्रवर्गाच्या मुला-मुलींना राजर्षी छत्रपतीशाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती या योजनेंतर्गत अर्ज भरुन महाविद्यालयास सादर करावा. संबंधित महाविद्यालयाने सर्व कागदपत्रांची छाननी करुन पात्र लाभार्थ्यांचे अर्ज संबंधित सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण यांचेकडे मंजूरीसाठी सादर करावेत. |

1 | योजनेचे नाव | विद्यानिकेतन शाळा चालविण्यासाठी स्वयंसेवी संस्थांना सहाय्यक अनुदान योजना. |
2 | योजनेचा प्रकार | राज्यस्तरीय योजना |
3 | योजनेचा उद्देश. | महाराष्ट्रातील विजाभज विद्यार्थ्याना निवासी शिक्षणाचा फायदा मिळावा आणि त्यांची शैक्षणिक सामाजिक व आर्थिक उन्नती व्हावी या उदेशाने सन-1953 पासून आश्रमशाळा योजना अंमलात आणली. तथापि विजाभज प्रवर्गातील होतकरु व हुशार गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यासाठी शासन निर्णय क्रमांक व्हीएएस/1090/प्र.क्र.135/मावक-6, दिनांक 6/11/1995 अन्वये स्वयंसेवी संस्था मार्फत स्वतंत्र विद्या निकेतन योजना सुरू करण्यास मंजुरी दिली आहे. शासन निर्णय दिनांक 31/7/1996 अन्वये विमुक्त जाती सेवा समिती वसंतनगर कोटग्याळ, ता.मुखेड जि.नांदेड या स्वयंसेवी संस्थेस विद्यानिकेतन सन-1996-97 पासून सुरू करण्यास मंजूरी देण्यात आलेली आहे. सध्या कार्यरत असलेल्या विद्यानिकेतन मध्ये इयता 5वी ते 12 वी पर्यंत वर्ग सुरू असून 640 निवासी विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. |
4 | योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नाव |
विमुक्त जाती/ भटक्या जमाती. |
5 | योजनेच्या प्रमुख अटी |
|
6 | दिल्या जाणा-या लाभाचे स्वरुप | शासन निर्णय क्र.विभशा-2011/प्र.क्र.182 / विजाभज-2, दि.16 मे, 2012 नुसार विद्यार्थी भोजनावर दरडोई दरमहा खर्च रु. 1000/- विद्यार्थ्यांना क्रमिक पुस्तके, गणवेश, स्टेशनरी इ. साठी प्रतिवर्षी प्रति विद्यार्थी रु.1450/- तसेच विद्यार्थ्यांना आंथरुन पांघरुन, पलंग, दैनंदिन स्वच्छता व दुरुस्ती खर्चासाठी प्रतिवर्षी प्रतिविद्यार्थी रु. 1000/- इतके अनुदान स्वयंसेवी संस्थेस देण्यात येते. याशिवाय वेतन, वेतनेत्तर अनुदान अनुज्ञेय आहे. याकरीता होणाऱ्या एकूण वार्षिक खर्चाच्या 10% खर्च संस्थेने उचलावयाचा आहे. |
7 | अर्ज करण्याची पध्दत | विजाभज आश्रम शाळेतील इयत्ता ४थी च्या वर्गात प्रवेशित विद्यार्थ्यांचे परिक्षेसाठी अर्ज संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांनी संबंधित सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांना सादर करावेत. |
8 | योजनेची वर्गवारी | शैक्षणिक |
9 | संपर्क कार्यालयाचे नांव | १) सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण सर्व. २) प्राचार्य, विद्यानिकेतन कमळेवाडी जि.नांदेड. |