शासन निर्णय क्रमांक 4370, दिनांक 5 नोव्हेंबर 1928 अन्वये स्टार्ट समितीची स्थापना.
सदर समितीमध्ये एकूण 10 सदस्यांचा समावेश. सदर समितीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचाही समावेश. समितीचा अहवाल 1930 साली शासनास सादर
मागास समाजासाठी 1932 साली बॅकवर्ड क्लास वेलफेअर डिपार्टमेंटची स्थापना. श्री. ओ एच बी स्टार्ट, आय. सी. एस., खात्याचे पहिले संचालक
1947 साली संचालक, बॅकवर्ड क्लास वेलफेअर यांचे कार्यालय मुंबई येथून पुणे येथे स्थलांतरित.
मा. श्री. गणपती देवजी तपासे, मंत्री, उदयोग, मत्स्यव्यवसाय आणि मागासवर्गीयांचे कल्याण यांच्या हस्ते दिनांक 9.8.1947 रोजी पुणे येथील संचालनालयाच्या इमारतीची कोनशिला बसविण्यात आली.
शासन निर्णय क्रमांक बी.सी.ई. - 2857 डी, दिनांक 23 सप्टेंबर 1957 अन्वये मुख्य निरीक्षक प्रमाणित शाळा आणि संचालक, बॅकवर्ड क्लास वेलफेअर या दोन कार्यालयांचे एकत्रीकरण करुन समाज कल्याण संचालनालयाची स्थापना
समाज कल्याण विभागाची निर्मिती होऊन शिक्षण व समाज कल्याण अशी विभागणी माहे मार्च 1972 मध्ये झाली.
समाज कल्याण, सांस्कृतिक कार्य, क्रिडा व पर्यटन विभाग असे नामकरण सन 1983 मध्ये करण्यात आले.
एप्रिल,1993 मध्ये पर्यटन हा विषय गृह विभागाकडे हस्तांतरित करण्यात आला.
मार्च,1999 मध्ये समाज कल्याण विभागाचे विभाजन करुन विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग कल्याण विभाग अशी स्वतंत्र विभागाची स्थापना करण्यात आली.
फेब्रुवारी 2001 मध्ये समाज कल्याण, सांस्कृतिक कार्य व क्रिडा विभागाचे नाव सामाजिक न्याय, सांस्कृतिक कार्य, क्रिडा विभाग असे करण्यात आले
सन 1932 मध्ये बॅकवर्ड क्लास वेलफेअर डिपार्टमेंटची स्थापना
सन 1957 मध्ये पुणे येथे समाज कल्याण संचालनालयाची स्थापना ( समाज कल्याण, महिला व बाल विकास , आ दिवासी विकास , विजाभज, इमाव व अपंग कल्याण विभाग एकत्रित )
सन 1982 मध्ये आदिवासी विकास विभाग स्वतंत्र
सन 1991 मध्ये महिला व बाल विकास विभाग स्वतंत्र
सन २००० मध्ये अपंग कल्याण आयुक्तालयाची निर्मिती
सन 2001 मध्ये विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग कल्याण संचालनालयाची निर्मिती